पनवेल ः वार्ताहर
फुटबॉलमध्ये महत्त्वाची असलेल्या संतोष ट्रॉफी स्पर्धेसाठी पनवेलमधील यश वनवेरू या युवा खेळाडूची महाराष्ट्र संघात निवड
झाली आहे.
यश वनवेरू हा रायगडमधून अनेक वर्षांनंतर निवडलेला पहिला खेळाडू आहे. त्याच्याबरोबरच सिद्धार्थ कोलाको, मध्यभागी, अलझार दिल्लीवाला, बचावपटू, अद्वैत शिंदे, मिड फिल्डर (सर्व रा. नवी मुंबई) यांचीसुद्धा संतोष ट्रॉफी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे सर्व जण महाराष्ट्रासाठी खेळणार असून त्यांचा पहिला सामना येत्या 3 डिसेंबर रोजी राजस्थानबरोबर होणार आहे. पनवेलसह रायगड व नवी मुंबईकरांनी या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …