Breaking News

पनवेल मनपातर्फे स्वच्छताविषयक विविध स्पर्धा

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत चित्रकला, पोस्टर जिंगल, गाणी, व्हिडीओ, शॉर्ट फिल्म, पथनाट्य, भित्तीचित्र स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभागी होऊन स्वच्छताविषयक जनजागृतीमध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

त्यासाठी स्पर्धेसाठी स्वच्छ सुंदर आधुनिक पनवेल शहर संकल्पना, माझी वसुंधरा अभियान, घनकचरा व्यवस्थापन (कचरा वर्गीकरण व कचरा प्रक्रिया), प्लास्टिक प्रदूषणाचे परिणाम, हागणदारी मुक्त पनवेल शहर, कचरा पुनर्चक्रीकरण पुनर्वापर करणे, नावीन्यपूर्ण संकल्पना व प्लास्टिक बंदी (3 आर- रिड्युस, रियुझ, रिसायकल) असे विषय देण्यात आले आहेत. ऑनलाईन पद्धतीने नागरिकांनी या स्पर्धेसाठी प्रवेश नोंदवायचा असून 25 डिसेंबरपर्यंत स्पर्धकांनी आपले अविष्कार पाठवायचे आहेत. या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. प्रवेशिका भरताना ओळखपत्र भरणे आवश्यक आहे.

या स्पर्धेत ग्रुपनेही सहभागी होता येईल. सर्व स्पर्धकांनी आपले अविष्कार दोन कॉपीमध्ये डीव्हीडीमध्ये स्वच्छ भारत अभियान कक्ष, दुसरा मजला, अग्निशमन इमारत, पनवेल महानगरपालिका येथे किंवा ऑनलाईन पद्धतीने जमा करावे. सदर स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम येणार्‍या तीन विजेत्यांना अनुक्रमे 3000, 2000, 1000 रुपयांचे पारितोषिक, प्रशस्तिपत्रक आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेचा निकाल 5 जानेवारी 2022 पर्यंत वैयक्तिक ई-मेलद्वारे, तसेच पालिकेच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कळविण्यात येईल.

प्रवेश निश्चित करण्यासाठी दिलेला क्यूआर कोड स्कॅन  करण्यात यावा, तसेच अधिक माहितीसाठी swachhpanvel.compettion@gmail.com  या आयडीवर संपर्क साधावा किंवा स्वच्छ भारत अभियान कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply