Breaking News

‘कामोठे गावच्या प्रलंबित समस्या त्वरित सोडवाव्यात’

कामोठे : रामप्रहर वृत्त

कामोठेतील विविध समस्यांसंदर्भात भाजप उत्तर रायगड ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष राजेश गायकर यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन सादर केले. कामोठे विभागाचा सिडकोकडून महापालिकेकडे हस्तांतरणाचा विषय अंतिम टप्प्यात आहे. प्रकल्पग्रस्त गावाच्या समस्या प्रलंबित ठेवून कामोठे विभागाच्या हस्तांतरणास विरोध करताना प्रलंबित मागण्यांचे निवेदन सिडकोला देण्यात आले. यामध्ये नैसर्गिक गरजेपोटीची जी बांधकामे केलेली आहेत ती हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्याआधी वाढीव गावठाणे निर्देशित करून त्यातील सर्व बांधकामे सरसकट नियमित करावीत. भविष्यात प्रकल्पग्रस्त शेतकर्‍याचे एकही बांधकाम पालिकेने तोडता कामा नये याची हमी सिडकोने घ्यायला हवी. कामोठे गावास लागून दोन बाजूस पूर्वी खेळाची मैदाने होती. शहरीकरणात या गावाभोवती मैदानच राहिलेले नाही. त्यामुळे कामोठे गावासाठी खेळाचे मैदान तातडीने आरक्षित करावे. गावात आळी आणि अथवा विभाग आहेत ज्यामध्ये अरुंद रस्ते व गल्ल्या आहेत. या अरुंद गल्ल्यांमुळे सर्व वाहने मुख्य रस्ता, पालखी रस्त्यांना व गावाभोवतीच्या रस्त्यांना नाईलाजाने उभी केली जातात. या पार्किंग समस्येमुळेच गावात अ‍ॅम्ब्युलंस फिरणे मुश्कील झालेले आहे. गावाभोवतीचे रिकामे असलेले भूखंड गावकर्‍यांना वाहनतळासाठी तातडीने आरक्षित करावेत. सिडकोने विविध नोडमध्ये, शहरांमध्ये, तसेच प्रकल्पग्रस्तांकरिता भूमिपुत्र भवन, आगरी कोळी भवन असे कम्युनिटी सेंटर बनवलेले आहेत. या कम्युनिटी सेंटरमधून प्रकल्पग्रस्त लग्नसोहळे, वाढदिवस, व्यायामशाळा, वाचनालय व समाज प्रबोधनाचे काम चालवले जातात. येथील प्रकल्पग्रस्तांकरिताही असे कमुनिटी सेंटर सिडकोने बनवावे. कामोठे गावात बाराही महिने पाणीटंचाई असते. 1996 सालची जलवाहिनी आता जीर्ण झालेली आहे. यामुळे गावात पाणीपुरवठा मुबलक नाही. ही जुनी वाहिनी काढून नवीन जलवाहिनी टाकून द्यावी व गावात पाण्याची नवी टाकी बांधून द्यावी, अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

 

प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यास ग्रामस्थांचा विरोध राहील. आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभे करू. तरी आपण ती वेळ प्रकल्पग्रस्तांवर आणू नये.

-राजेश गायकर, अध्यक्ष, भाजप ओबीसी मोर्चा,  उत्तर रायगड

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply