म्हसळा नगरपंचायत निवडणूक
म्हसळा : प्रतिनिधी
येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आठ उमेदवार उभे केले असून, त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ गुरुवारी (दि. 16) ग्रामदैवत श्री धावीर देव महाराज यांना श्रीफळ अर्पण करून करण्यात आला.
म्हसळा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवीत आहे. त्यासाठी भाजपने संतोष पानसरे (प्रभाग क्रमांक 06), सरिता पानसरे (प्रभाग क्रमांक 15), सचिन करडे, प्रसाद पोतदार (प्रभाग क्रमांक 16), गौरी पोतदार (प्रभाग क्रमांक 05), नंदिनी पवार (प्रभाग क्रमांक 13) यांना उमेदवारी दिली आहे, तर शरद चव्हाण हे प्रभाग क्रमांक 17 व 12मधून निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून म्हसळा शहरातील सुजाण मतदार भाजपच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजयी करतील, असा विश्वास तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर यांनी या वेळी व्यक्त केला.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नाना महाले, म्हसळा तालुका सरचिटणीस सुनील शिंदे, महेश पाटील, माजी तालुका अध्यक्ष शैलेश पटेल, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष सुनंदा पाटील, मीना अनिल टिंगरे यांच्यासह भाजप उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.