मुरूड : प्रतिनिधी
मुरूड शहरात काही राजकीय पक्षांनी अनधिकृतपणे तीन दिवसांचा बंद पुकारला आहे. गंभीर बाब म्हणजे या बंदमध्ये मेडिकल आणि दूध डेअरी यांनाही मुभा देण्यात आलेली नाही. हा सरसकट बंद चुकीचा असून, या बंदचा आम्ही निषेध करतो, अशी स्पष्ट भूमिका भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवारी (दि. 29) पत्रकार परिषद घेऊन मांडण्यात आली.
या पत्रकार परिषदेला भाजपचे मुरूड तालुका उपाध्यक्ष महेश मानकर, शहर अध्यक्ष उमेश माळी, अमीन खानजादा, बाळा गुरव, अभिजित पानवलकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी महेश मानकर यांनी आरोप केला की, सोशल मीडिया आणि शिवसेनेच्या फलकावर तीनदिवसीय बंदचे आवाहन करतेवेळी मनसे व शिवसेनेचा उल्लेख आढळून आला आहे.
त्यामुळे हा बंद अॅक्टिव्ह मेंबरचा नसून या दोन राजकीय पक्षांचा आहे. सर्वसाधारणपणे बंदमध्ये औषधांची दुकाने व दूध डेअरी यांना सवलत दिली जाते, मात्र मुरूडमध्ये सर्व दुकाने बंद आहेत. कोरोना काळात संचारबंदीमुळे लोक तीन महिने घरात बसून होते. त्यांच्या हाताला काम नाही. त्यातच बंद पुकारण्यात आल्याने येथील विशेषत: भाजीपाला व मासळी विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे. याशिवाय सध्या शेतीचा हंगाम सुरू झाला असून, शेतकर्यांना शेतीची अवजारे, खते व बियाणे विकत घावयाची आहेत, मात्र या बंदमुळे शेतकरीवर्गही हैराण झाला आहे.
अमीन खानजादा यांनी, आधी बाहेरून येणार्या लोकांवर बंदी घाला म्हणजे रुग्णसंख्या वाढणार नाही, असे सूचित केले, तर उमेश माळी यांनी बंदमध्ये मेडिकल व दूध अशी अत्यावश्यक दुकानेही बंद करण्यात आली असल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचे नमूद केले.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …