पनवेल : प्रतिनिधी
बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवाचे चेअरमन अॅड. गजानन चव्हाण आणि व्हाईस चेअरमन अॅड. संग्राम देसाई यांनी सोमवारी (दि. 21) रोजी पनवेल कोर्टाला भेट दिली असता त्यांचा पनवेल वकील संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवाचे चेअरमन अॅड. गजानन चव्हाण आणि व्हाईस चेअरमन अॅड. संग्राम देसाई यांनी सोमवारी संध्याकाळी पनवेल कोर्टात वकिलांची भेट घेतली. या वेळी त्यांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. पनवेल वकील संघटना आणि अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष अॅड. मनोज भुबळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अॅड. दीपक गायकवाड यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. या वेळी बार कौन्सिलच्या माध्यमातून वकिलांकरिता सुरू असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती त्यांनी दिली. या वेळी पनवेल वकील संघटना आणि अधिवक्ता परिषद पनवेलचे पदाधिकारी, पनवेल-उरण येथील ज्येष्ठ व नवोदित विधिज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. सुनील तेलंगे यांनी केले, तर आभार अॅड. संतोष पवार यांनी मानले.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …