Breaking News

‘कुल’ धोनीचा नवा अवतार

चेन्नई ः वृत्तसंस्था

टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी आपल्या हेअरस्टाईलमुळे अगदी भारतीय संघातील पदापर्णापासूनच चर्चेत राहिला आहे. आता पुन्हा एकदा आपल्या नव्या अवतारामुळे धोनी चर्चेत आला आहे. महेंद्रसिंह धोनी सध्या आयपीएलच्या तयारीत गुंतला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनून तो आपल्या संघाच्या पूर्ण तयारीसाठी लक्ष देत आहे. नुकतेच सीएसकेच्या खेळाडूंसह धोनीने मैदानात सरावालाही सुरुवात केली आहे, मात्र सोशल मीडियावर धोनीचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. आयपीएलची अधिकृत प्रसारण वाहिनी असलेल्या स्टार स्पोर्टने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून धोनीचा हा फोटो शेअर केला आहे. त्यानंतर ट्विटर आणि फेसबुकवर माहीचा नवा अवतार सर्वांनाच आश्चर्याने अवाक करीत आहे. या फोटोमध्ये धोनी बुद्ध भिक्षुकाच्या अवतारात दिसत असून, त्याच्या डोक्यावरील सगळे केस काढण्यात आले आहेत. धोनीचा हा फोटो कुठल्यातरी जाहिरातीसाठी काढण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे; कारण या फोटोवर तसे लिहिल्याचे दिसून येते. मार्शल आर्ट्स ट्रेनिंग कॅम्पचा हा फोटो असल्याचे सांगण्यात आलेय. धोनीच्या या फोटोलाही सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत असून, चाहत्यांना हा लूक आवडला आहे. या फोटोला शेअर करून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply