Breaking News

म्हसळ्यात एकाच रात्री सहा घरफोड्या

म्हसळा : प्रतिनिधी

शहरातील भरवस्तीत असलेली पाच बंद घरे गुरुवारी (दि. 23) रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडली. तर शुक्रवारी सकाळी मोमीनपुरा येथील एकघर चोरट्यांनी फोडल्याचे लक्षात आले. या प्रकरणी सुनील द्वारकानाथ उमरटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन म्हसळा पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमरटकर यांच्या घरातील सोन्या, चांदीच्या वस्तू  व रोख रक्कम मिळून सुमारे 68 हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. मंगेश हेगीस्टे यांच्या घरांतील सातशे रुपयांच्या वस्तू, मोमीनपुरा येथील नवीद घरटकर यांच्या घरांतून दोन हजार पाचशे, साने आळीतील जमाल तळकर यांच्या घरांतून पाच हजार रुपये रोख रक्कमेवर चोरट्यानी डल्ला मारला आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply