पनवेल ः खारघर ओवेपेठ येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 18वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ, गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा गुणगौरव सोहळा आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा चिंतन सोहळ्याचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी आणि शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला.खारघर ओवेपेठ येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 18वा वार्षिक पारितोषक वितरण समारंभ, 2018मधील दहावीतील गुणवंत विद्यार्थी आणि प्रज्ञावंत शिक्षकांचा गुणगौरव सोहळा तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक वर्षामध्ये विविध स्पर्धा आणि परीक्षेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, तळोजे विभाग अध्यक्ष प्रभाकर जोशी, सचिन वासकर, आबा कोळी, रामभाऊ वासकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
Check Also
जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …