Breaking News

भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात फूड फेस्ट ; शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शैक्षणिक कार्यक्रमांसोबतच शिक्षणेतर कार्यक्रमसुध्दा आयोजित करण्यात येतात. त्यानुसार महाविद्यालयात प्रथमच फूड फेस्ट-2019चे आयोजन करण्यात आले होते.

फूड फेस्टचे उद्घाटन  ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि.च्या संचालिका शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सदस्या वर्षा प्रशांत ठाकूर,  व्हीब फाऊंडेशन संचालिका  तथा विश्वस्त, वीर वुमन ग्रुपच्या विश्वस्त अर्चना परेश ठाकूर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी अतिथींचे स्वागत केले. या स्पर्धेअंतर्गत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन चिकन टॉर्टलस, स्पायसी चिकन ग्रेव्ही आणि बन, कोळंबी भाकरी, कोळंबी भात, चिकन भुना रोल, चिकन ग्रेव्ही आणि भाकरी, थेपला मिरची, मिसळ, व्हेज क्रिस्पी पॅन केक, कचोरी, पेरू ज्यूस, पावभाजी, दाल मखनी, पालक पनीर, पोहे, व्हेज पुलाव, चॉकलेट यांसारखे नानाविध शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ सादर केले. या स्पर्धेत पदार्थाचे सादरीकरण, स्वच्छता आणि चव अशा बाबींसाठी विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले आणि अतिथी शकुंतला रामशेठ ठाकूर, वर्षा प्रशांत ठाकूर आणि अर्चना परेश ठाकूर यांनी सर्व बाबी पडताळून गुणांकण केले आणि सर्वाधिक गुण मिळविणार्‍या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे जाहीर करून त्यांना प्रशस्तिपत्रके वितरित केली. या स्पर्धेत मांसाहारी पदार्थांत  सिंड्रेला जयसन हिला चिकन भुना रोल या पाककृतीसाठी प्रथम, तर  सबा हासवरे हिला चिकन टॉर्टलस या पाककृतीसाठी द्वितीय पारितोषिक देण्यात आले. शाकाहारी पदार्थांत   प्रतीक्षा कदमला दाल मखनी, पालक पनीर या पाककृतीसाठी प्रथम, तर मानसी शेलारला चॉकलेट या पाककृतीसाठी द्वितीय पारितोषिक देण्यात आले. खाण्याच्या नानाविध पदार्थांची रेलचेल असल्यामुळे या वेळी विद्यार्थ्यांनी  फूड फेस्टचा मनमुराद आनंद लुटला.

विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी  विविध उपक्रम राबविले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच सामाजिक, व्यक्तिमत्व विकासात
भर पडणार आहे. -शकुंतला ठाकूर

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply