Breaking News

नेरळ ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आणा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील महत्त्वाच्या नेरळ ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. नेरळ शहरातील सानेवाड्यासमोर भाजपच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी (दि. 10) आमदार ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. नेरळमध्ये पूर्वीपासून भाजपचे विचार रूजले आहेत. त्यामुळे ही ग्रामपंचायत पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात आली पाहिजे, असे ते म्हणाले.

नेरळमधील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प आणि शहराचे योग्य नियोजन करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यायला भाजपचे सरपंच निवडून आणणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. या कार्यक्रमास भाजपचे कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष व माजी आमदार देवेंद्र साटम, जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, सरचिटणीस दीपक बेहेरे, चिटणीस रमेश मुंढे, समिधा टिल्लू, कर्जत तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, सरचिटणीस प्रवीण पोलकम, नेरळ शहर अध्यक्ष अनिल जैन, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा सुगंधा भोसले, नेरळ अध्यक्ष नीता कवाडकर, प्रज्ञा प्रकोष्ठचे कोकण संयोजक नितीन कांदळगावकर, किसान मोर्चा प्रदेश सचिव सुनील गोगटे, माजी उपसरपंच बल्लाळ जोशी, ग्रामपंचायत सदस्य मंगेश म्हसकर, माजी सदस्य नरेश पवार, ज्येष्ठ कार्यकर्ते माधव गायकवाड, आनंद सुगवेकर, अरुण धारप, नारायण सुर्वे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply