Breaking News

रायगडातील पहिले स्किल हब नेरळमध्ये

कर्जत : बातमीदार

देशभरात 5000 स्किल हबच्या माध्यमातून आठ लाख युवकांना मिळणार व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून स्किल हब उभारले आहेत. रायगड जिल्ह्यातील पहिले स्किल हब नेरळ येथे उभारण्यात येत असून त्याची सुरुवात रायगड जेएसएमने पुढाकार घेऊन केली आहे.

कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालय भारत सरकारच्या यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यत जन शिक्षण संस्था काम करीत आहे. रायगड या योजनेत कार्य करत असणार्‍या नेरळ-कर्जत येथे जनशिक्षण संस्थान रायगड आणि करिअर टेक्निकल संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने स्किल हबसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. नेरळ येथे कौशल्य विकास मंत्रालयाचे स्किल हब योजनेतील जिल्यातील पहिले सेंटर सुरू करण्यात आले. असिस्टंट इलेक्ट्रिशियन आणि फिल्ड इंजिनीअर आरएसीव्ही प्रशिक्षण वर्गाचे सुरू करण्यात आले.

या योजनेत देशभरात 5000 स्किल हबच्या माध्यमातून आठ लाख युवकांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन सोहळ्याला इलेक्ट्रिशियन आणि एसी, फ्रिज व वॉशिंग मशीन रिपेरिंग वर सखोल मार्गदर्शन व प्रात्यक्षिक गणेश भोपी आणि विजय रणदिवे यांनी केले. या वेळी जनकल्याण संस्थानच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमैया, संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी आणि व्यवस्थापक मंडळ यांची उपस्थिती होती.

या संस्थेच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजने अंतर्गत कार्यक्रम राबवित आहे. उद्घाटनाच्या वेळी डॉ. सोमय्या यांच्यासह संचालक विजय कोकणे, अन्वया करंदीकर, कर्जत पंचायत समितीच्या माजी सभापती सुजाता मनवे, कौशल्य विकासचे राज्य प्रतिनिधी संजय वर्तक, तसेच कौशल्य विकासचे जिल्हा प्रतिनिधी सायली सुभाने, रोजगार समन्वयक नवीन भोपी, रंजना नवीन भोपी, असिस्टंट इलेक्ट्रिशियन प्रशिक्षकी गणेश भोपी, फिल्ड इंजिनीअर प्रशिक्षक विजय रणदिवे, पोस्ट मास्तर अविनाश डायरे, दिनेश कांबरी आदी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply