खारघर : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून 15 ते 18 वयोगटातील मुलांना व मुलींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीमेला सोमवारी (दि. 3) सुरुवात झाली. खारघरमध्ये प्रभाग क्रमांक 06 मध्ये सेक्टर 16 केपीसी शाळेत या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ नगरसेवक निलेश मनोहर बाविस्कर यांच्या उपस्थितीत झाला.
पनवेल महापालिकेच्या वतीने आयोजित केपीसी शाळेत झालेल्या या लसीकरण मोहिमेत पहिल्याच दिवशी मुलामुलींना 500 डोस देण्यात आले. याबद्दल येथील नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी पनवेल महापालिकेच्या महापौर, डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, तसेच शाळेचे ओनर रचित छेडा यांचे आभार मानले.