Breaking News

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना जयंतीनिमित्त अभिवादन

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात महिला विकास कक्षाच्या वतीने सोमवारी (दि. 3) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, आयक्यूएसीचे समन्वयक, डॉ. बी. डी. आघाव  व इतर प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे महत्त्व सांगून व त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले, तसेच उपस्थित प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिवादन केले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता महिला विकास कक्षाच्या प्रमुख, डॉ. आर. डी. म्हात्रे, डॉ. एस. एम. भोईर, प्रा. एस. एम. हुद्दार आणि प्रा. बी. ए. भोईर यांनी विशेष परिश्रम घेतले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयाचे आयक्यूएससी समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, रुसा समन्वयक डॉ. शैलेश वाजेकर यांनी मार्गदर्शन आणि शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर आणि सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये देशाच्या पहिल्या स्त्री शिक्षिका आणि स्त्री शिक्षणाच्या उद्गात्या, क्रांतिज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येथील त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून क्रांतिज्योती सावित्रीबाई यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या वेळी प्राचार्या साधना डोईफोडे यांच्यासह रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य रयत को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक प्रमोद कोळी, संस्थेचे नवनियुक्त लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक जगन्नाथ जाधव, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, सांस्कृतिक विभाग प्रमुख ज्योत्स्ना ठाकूर, शिक्षक पालक संघाचे सचिव देवेंद्र म्हात्रे, ज्येष्ठ शिक्षक सुनील गावंड, क्रीडा विभागप्रमुख जयराम ठाकूर, गुरुकुल प्रमुख संदीप भोईर, उपशिक्षक प्रसन्न ठाकूर व सागर रंधवे, ज्येष्ठ अध्यापिका उज्ज्वला म्हात्रे, उपशिक्षिका हर्षला पाटील, संपदा म्हात्रे, ज्युनियर कॉलेजच्या प्रा. अर्चना पाटील आदी उपस्थित होते. विद्यालयाच्या उपशिक्षिका हर्षला पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

उरण : रामप्रहर वृत्त

कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याधापिका, स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणार्‍या सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी पूजन करून अभिवादन केले.

या वेळी सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणासाठी घेतलेली मेहनत व बहुजणांच्या उद्धारासाठी त्यांनी केलेले कार्य याविषयी चिंतन करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यात त्यांनी दिलेली साथ निश्चितच देशाच्या पुरोगामी वाटचालीला व चळवळीला दिशादर्शक व प्रेरणादायी आहे. याविषयी मत प्रदर्शित करण्यात आले. या वेळी प्राचार्य डॉ. बळीराम एन. गायकवाड, प्रा. के. ए. शामा, प्रा. व्ही. एस. इंदूलकर, प्रा. डॉ. ए. आर. चव्हाण, प्रा. एच. के. जगताप, प्रा. डॉ. पी. आर. कारूळकर, प्रा. ए. एन. गायकवाड, प्रा. डॉ. एम. जी. लोणे, कार्यालयीन अधीक्षक तानाजी घ्यार आदींसह कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply