Breaking News

‘विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणाची आस धरावी’

उरण ः वार्ताहर

विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणाची आस धरावी, असे आवाहन प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांनी केले. ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था संचालित रामचंद्र म्हात्रे विद्यालय अ‍ॅण्ड जुनिअर कॉलेज आर्टस्, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना स्वागत प्रवेश सोहळ्यात कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी कार्यक्रमात नवीन प्रवेश घेतलेल्या अकरावी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसोबत आलेल्या पालकांचे स्वागत करण्यात आले. दहावी परीक्षेत दहावीमध्ये आवरे केंद्र आणि रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे येथे प्रथम आलेला विद्यार्थी प्रशील राजेंद्र म्हात्रे, द्वितीय साक्षी सुनील वर्तक, तृतीय कुमारी अर्पिता अंकेश म्हात्रे या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी खजिनदार पुष्पलता बाळासाहेब म्हात्रे,  विद्यालयाचे प्राचार्य गायकवाड, पालक प्रतिनिधी गणेश ठाकूर, विजया म्हात्रे, सुनील वर्तक, योगिता वर्तक आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply