कर्जत : बातमीदार
कर्जतमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या 44व्या ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी 14 जानेवारीपर्यंत चालणार्या सप्ताहात कीर्तन, प्रवचन, भजन होणार नसून मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पारायण व हरिपाठ होणार आहे.
कोरोना महामारीचा प्रादूर्भाव वाढत असल्याने अखंड हरिनाम सप्ताह खुल्या मैदानात न घेता कर्जतमधील श्री माऊली निवास येथे घेण्यात आला आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचे कर्जतमधील सर्व स्थानिक देवतांना तसेच मशिद, बहरी मशीद या ठिकाणी स्थानिक यजमानांच्या हस्ते पूजा आणि प्रार्थना करून सप्ताहासाठी आवाहन करण्यात आले. नंतर पहाटे 4 वाजता श्री माऊलींना महाभिषेक आणि षोडशोपचारे महापूजन करण्यात आले.
या वेळी ज्ञानेश्वरी पारायण समितीचे अध्यक्ष हभप नथुराम महाराज हरपुडे, हभप मारुती महाराज राणे, संतोष वैद्य, दत्तात्रेय म्हसे, वासुदेव इंगळे, चंद्रकांत म्हसे, प्रभाकर केळकर, सुदाम कार्ले, वनिता म्हसे, रत्नप्रभा जोशी, नरेंद्र जोशी, ज्ञानेश्वर बागडे, ओमकार दळवी, योगेश कुंभार, आदित्य दळवी, अमोल देशमुख, कोमल देशमुख आदी उपस्थित होते.