पनवेल : रामप्रहर वृत्त
मासेमारीचा व्यवसाय अभिमानाचा व्यवसाय आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मच्छीमार संस्थेच्या उद्घाटनावेळी केले.
राधा राम मच्छिमार सहकारी संस्थेची 65 सदस्यांनी एकत्रित येऊन स्थापना केली आहे. त्यानुसार या संस्थेेचे कार्यालय खारकोपर येथील मराठी शाळेजवळ सुरू झाले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम.म्हात्रे यांच्या उपस्थितीत नुकतेच झाले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगीतले की, 65 सदस्यांनी एकत्रित येऊन ही सोसायटी स्थापन केली असून लवकरच ही संस्था मोठी होईल, त्यामुळे लहानातून मोठे होत असताना गर्व न बाळगता स्वाभीमानाने काम करा, असे प्रतिपादन केले.
या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम.म्हात्रे, ज्येष्ठनेते पांडुरंग घरत, जितेंद्र म्हात्रे, भाऊशेठ पाटील, सुधीरशेठ ठाकूर, वामनशेठ ठाकूर, रमेश ठाकूर, लालचंद घरत, अनंत ठाकूर, भाऊशेठ भोईर, व्ही.के.ठाकूर, सी.एल.ठाकूर, रामदास नाईक, सतीष कोळी, मानीक कोळी, चंद्रकांत कोळी, चेअरमन नामदेव ठाकूर, गुरुप्रसाद म्हात्रे, श्रीधर मोकल, प्रमोद ठाकूर, विष्णू कोळी, नर्रश मोकल, कुंदन म्हात्रे, प्रवीण ठाकूर, सुरज घरत, नरेश ठाकूर, रतन ठाकूर, रमण पाटील, अमीत पाटील, रोहन कोळी, नारायण कोळी, महेंद्र कोळी, राजेंद्र मोकल, दिपक पाटील, नारायण पाटील, मयुर मोकल, ताणाजी ठाकूर, गणेश गोंधळी प्रमोद ठाकूर आदी उपस्थित होते.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper