चौक : उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत 51 लाखांची यंत्रसामग्री खालापूर तालुक्यातील चौक ग्रामीण रुग्णालयात देण्यात आली असून त्याचे लोकार्पण शनिवारी (दि. 15) झाले.
चौक हा ग्रामीण विभाग असून येथे मोठ्या प्रमाणात आदिवासी व गरीब गरजू लोकांची वस्ती आहे. त्यांना योग्य ते उपचार व येण्या-जाण्यासाठी लागणार्या रुग्णवाहिकेसह अन्य सामग्री आमदार महेश बालदी यांनी स्थानिक विकास निधी अंतर्गत दिली आहे.
यामध्ये डुरा सिलेंडर तीन नग, जंबो सिलेंडर दहा नग, जनरेटर एक नग, मल्टीपरा मॉनिटर पाच नग, सेल काउंटर मशिन एक नग (33.50 लाख रुपये) आणि रुग्णालयासाठी लागणारी सर्व सोयींनी युक्त रुग्णवाहिका (17.50 लाख) सेवेसाठी दिली आहे.
या लोकार्पण सोहळ्यास माजी आमदार देवेंद्र साटम, भाजप खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, वैद्यकीय अधीक्षक मनोज बनसोडे, चौक जि. प. विभागीय विभागीय अध्यक्ष गणेश मुकादम, माजी उपसरपंच गणेश कदम, ज्ञानेश्वर साखरे, तालुका कोषाध्यक्ष अरुण पारठे, वडगाव जि. प. विभागीय अध्यक्ष संदीप पाटील, केळवणे जि. प. विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, तालुका कोषाध्यक्ष अरुण पारठे, दामू खैर, सुदेश महागावकर, पंकज शहा, मनोज साखरे, अश्विनी माळी, यशवंत जोशी, मोहन मुकादम, तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी, विजय ठोसर, अनिल भुवड, स्वप्नील मुकादम, समीर मोरे, प्रकाश घोगरे यांच्यासह चौक परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
या वेळी आमदार महेश बालदी यांनी आपल्या मोजक्या शब्दांच्या मनोगतामध्ये म्हटले की, दिलेली मदत ही आमदार निधीतून असून त्याचा आदिवासी व गोरगरीब, गरजूंसाठी उपयोग व्हावा व त्यांना वेळेवर औषधोपचार मिळावे, तसेच त्यांना योग्य वेळी ये-जा करण्याकरिता अँब्युलन्स उपलब्ध व्हावी यासाठी आहे. जनसेवेसाठी मी नेहमीच तयार असेन. ग्रामीण भागात वेळोवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्यामुळे रुग्णांचे होणारे हाल टळावेत यासाठी आपण एक जनरेटर देत आहोत. त्याचाही गरजूंना उपयोग होईल अशी अपेक्षा करतो.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …