पनवेल : रामप्रहर वृत्त
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने पनवेलमधील वृत्तपत्र विक्रेत्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेल्या या उपक्रमाला आज कोरोना किंवा लॉकडाऊनकाळातदेखील खंड नाही. आजही प्रतिष्ठानतर्फे विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ’ब्रेक द चेन’ मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत राज्य सरकारने कठोर निर्बंध जारी केले आहेत. याच निर्बंधांतर्गत अत्यावश्यक वगळता उर्वरित सर्व विक्रीवर बंदी घातली आहे. वृत्तपत्रे मात्र अत्यावश्यक श्रेणीतच आहेत. त्यामुळे त्यांची छपाई, वितरण व विक्री सुरूच राहणार आहे. त्यावर बंधने नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. पण, त्यानंतरही काही ठिकाणी स्टॉल विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे, अशा परिस्थितीत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमधील वृत्तपत्र विक्रेत्यांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप सोमवारी (दि. 3) संध्याकाळी 4 वाजता गणपती मंदिरासमोर कापड बाजार येथे करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी किंवा अधिक माहितीसाठी 7400119797, 9323233435, 9987733987 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांनी केले आहे. लोकनेेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने 70 समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचे पनवेलमधील नागरिकांकडून कौतुक होत आहे.