होण्डा कंपनीतर्फे यांत्रिकीकरणाचे सादरीकरण
पोलादपूर : प्रतिनिधी
कृषी विभाग यांच्या वतीने आत्मा योजनेंतर्गत पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी येथे आंबा पीक शेतीशाळा घेण्यात आली. त्याला शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शेतीशाळेत होंडा कंपनीच्या शेतीविषयक विविध उपकरणांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांनी महाडीबीटी पोर्टलवर शेतकर्यांनी ऑॅनलाइन अर्ज करून अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
पोलादपूर तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शेतीशाळेचे प्रास्ताविक कृषी सहाय्यक मनोज जाधव यांनी केले. मजुरांच्या टंचाईवर आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून शेती करणे काळाची गरज असल्याचे सुरज पाटील यांनी सांगितले.
कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे यांनी आंबा लागवड, छाटणी, आंबा मोहर संरक्षण याबाबत मार्गदर्शन केले. होंडा कंपनीचे प्रतिनिधी निखील पोहरे यांनी कंपनीच्या उत्पादनांची माहिती देऊन प्रात्यक्षिके सादर केली.
होंडा कंपनीचे अधिकृत विक्रेते राहुल गोडसे, सरपंच नितीन मोरे, नामदेव येरुणकर, शेखर येरूणकर, ज्ञानेश्वर मोरे, प्रकाश दळवी, बाळकृष्ण मोरे, सागर मोरे, प्रवीण महाडिक, राजेंद्र दळवी, सुरेशराव मोरे आदी यावेळी उपस्थित होते. अनिल डासाळकर यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिकेत मोरे, अनिरुद्ध येरुणकर, संजय मोरे, प्रसाद पवार, विनोद मोरे, विकास येरुणकर, अविनाश येरुणकर, दीपक सुर्वे, दीपक कदम यांनी सहकार्य केले.