Breaking News

प्रगती एक्स्प्रेसचे इंजीन बंद; प्रवाशांचा खोळंबा

ठाणे ः प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात काल प्रगती एक्स्प्रेसचे इंजीन बंद पडल्यामुळे पुण्याहून मुंबईला येणार्‍या शेकडो प्रवाशांचा खोळंबा झाला. अर्ध्या तासापासून प्रगती एक्स्प्रेस स्थानकात उभी होती. 

गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेचे वेळापत्रक ’रुळावर’च आले नाही. रेल्वे रुळांना तडे, ओव्हरहेड वायर तुटणे, इतर तांत्रिक बिघाड आदी कारणांमुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत होत असते. मध्य रेल्वेवर कालही प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. पुण्याहून मुंबईला येणार्‍या प्रगती एक्स्प्रेसचे इंजीन ठाणे रेल्वे स्थानकात बंद पडले. त्यामुळे एक्स्प्रेस अर्धा तास स्थानकातच थांबवण्यात आली होती. परिणामी मुंबईला जाणार्‍या शेकडो प्रवाशांचा खोळंबा झाला.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply