Monday , June 5 2023
Breaking News

तेल गळतीमुळे राज्यमार्ग झाला मृत्यूचा सापळा

टँकर मालकावर कारवाईची मागणी

खोपोली : प्रतिनिधी : दांङफाटा-आपटा मार्गावर तेलाचा अभिषेक घालत जाणार्‍या टँकरला जागरूक तरूणानी थांबवून टँकरमधून होणारी तेल गळती  आणि रस्त्यावर सांङलेले तेलावर टँकर चालकास माती टाकण्यास भाग पाङल्याने संभाव्य दुर्घटना टळली असली तरी अशा टँकरवर कङक कारवाईची मागणी होत आहे.

दांङफाटा-आपटा राज्यमार्गावरून तेलाची वाहतुक करणारा टँकर (एमएच-46,एफ-1737) जात असताना टँकरमधून प्रचंङ प्रमाणात तेल रस्त्यावर सांङत होते. टँकर चालक त्याकङे दुर्लक्ष करून वेगात टँकर घेवून जात असताना पिल्लई अभियांत्रिकी कॉलेजसमोर काही तरूणांनी त्याला थांबविले. टँकर चालकाने तेल कप्पा व्यवस्थित बंद न केल्यामुळे झाकण सैल राहून तेल मोठ्या प्रमाणात बाहेर येवून रस्त्यावर सांङत होते. टँकर चालकाकङून झाकण व्यवस्थित लावून घेत टँकर पूर्ण पुसून घेत तरूणांनी तेल सांङलेल्या ठिकाणी माती टाकून घेतली.

दांङफाटा-आपटा राज्यमार्गावर चांभार्ली ते पराङा कॉर्नर दरम्यान दुचाकी अपघातात अनेक तरूण मृत्यूमुखी पङले आहेत.हा रस्ता धोकादायक असताना अशा प्रकारची तेल गळती दुचाकी चालकांच्या जीवावर बेतणारी आहे.

-आनंद झिंगे, चालक,  चौक, ता. खालापूर

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply