Breaking News

कर्जत-कल्याण राज्यमार्गाची डागडुजी करा

अन्यथा आंदोलन; भाजपचा इशारा

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील  कर्जत-कल्याण राज्य महामार्ग अनेक ठिकाणी खराब झाला आहे. त्या रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षापूर्वी कर्जत-कल्याण राज्य महामार्गाचे कर्जत तालुक्यातील काम केले आहे. हा रस्ता काही ठिकाणी नादुरुस्त झाला आहे. भाजप किसान मोर्चाचे कोकण संघटक सुनिल गोगटे, भाजप तालुका सरचिटणीस संजय कराळे, शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष मयूर शितोळे, भाजप सांस्कृतिक सेलचे विजय कुलकर्णी आदींनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्जत उपविभागीय अभियंत्यांची भेट घेऊन कर्जत-कल्याण राज्य महामार्गाच्या दुरुस्तीबाबत निवेदन दिले.

कर्जत-कल्याण राज्य महामार्गावर काही ठिकाणी रस्ता दुरुस्तीची कामे केली जात आहेत. मात्र जिथे काँक्रीटचा रस्ता आहे, तिथे डांबराने खड्डे बुजवले जात आहेत. डांबर आणि काँक्रीट हे व्यवस्थित चिकटत नाही काही दिवसातच पुन्हा त्यावर खड्डे पडतील.

या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष घालून ठेकेदाराकडून योग्य पद्धतीत काम करून घ्यावे, अन्यथा भारतीय जनता पक्ष याविरुद्ध रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असे निवेदनात म्हटले आहे.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply