Breaking News

पनवेलच्या रोहिदास वाड्यातील कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहरातील रोहिदास वाडा येथे महापालिकेच्या वतीने समाज मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे. या समाजमंदिराच्या कामाची महापालिका सभागृह नेते परेश ठाकूरयांनी शनिवारी (दि. 15) अधिकार्‍यांसह पाहणी केली. या वेळी त्यांनी या कामाचा आढावा घेऊन अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या, तसेच या वेळी त्यांनी परिसरातील गटारे आणि रस्त्यांच्या कामाचीही पाहणी केली.
पनवेल महापालिकेमार्फत अनेक विकासाची कामे महापालिका क्षेत्रात सुरू आहेत. त्यानुसार प्रभाग क्रमांक 19मधील रोहिदास वाडा येथे समाजमंदिर उभारण्याचे काम सुरू आहे. या मंदिराच्या कामाची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पाहणी करून आढावा घेतला, तसेच या वेळी त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील गटारे, अशोका गार्डन परिसरातील गटारांची पाहणी, तथास्तू हॉलजवळील परिसरातील रस्त्याची कामे आणि पंचरत्न सर्कल येथील नाल्याची पाहणी अधिकार्‍यांसोबत केली.
या वेळी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, शहर अभियंता संजय कटेकर, आरोग्य निरीक्षक संजय जाधव, भाजप प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष पवन सोनी, प्रवीण मोहोकर, मधुकर उरणकर, बाबाया जाधव, रजनिस जाधव, सचिन उरणकर, मंगेश पिळविलकर, सुधीर कटेकर आदी उपस्थित होते.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply