Breaking News

फणसाड अभयारण्यातील पक्षीसंख्येत वाढ; भीमपंखी फुलपाखरासह दुर्मिळ अष्टपाद प्राण्यांचेही दर्शन

मुरूड : प्रतिनिधी

वनविभाग आणि ग्रीन वर्कस् ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी महिन्यात तीन दिवस मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात पक्षीगणना केली. त्यामध्ये अभयारण्यातील पक्षीसंख्येत वाढ दिसून आले. या वेळी अभयारण्यात दुर्मिळ अष्टपाद प्राण्यांही आढळले. वन कर्मचारी आणि ग्रीन वर्कस् ट्रस्ट या संस्थेचे कार्यकर्ते यांनी एकत्रितरित्या जानेवारी महिन्यात तीन दिवस फणसाड अभयारण्याचे 54 चौरस किलोमीटर क्षेत्र पिंजून काढून विविध पक्ष्यांची गणना केली व त्याची माहिती प्रशासनास सादर केली आहे. या अहवालात अभयारण्यातील पक्ष्यांची संख्या वाढती असल्याचे दिसून येत आहे. तसेच येथे विविध वन्यजीव, औषधी वनस्पती आणि दुर्मिळ अष्टपाद प्राणीही आढळून आले. या तीन दिवसांच्या कालावधीत अभयारण्यात 162 पक्ष्यांची नोंद करण्यात आली. केंटीश प्लोव्हर, ब्लुइथ्रोट, पडद्यफिएल्ड वॉरब्लेर, येल्लोव-ब्रॉवेद, वॉरब्लेर हे पक्षी अभयारण्यात पहिल्यांदाच आढळले. त्याव्यतिरिक्त इंडियन  फॉरेस्ट स्कॉर्पिओन, इंडियन  व्हीओलेतं टारांटूला, बर्ड  द्रोपंपींग स्पायडर, ग्रीन हुंट्स्मन स्पायडर या दुर्मिळ अष्टपाद प्राण्यांचेही दर्शन झाले. गुहागरपासून दक्षिणेला दिसणार्‍या भिमपंखी या भारतातील सर्वात मोठ्या फुलपाखराचे दर्शन या दुसर्‍या पक्षीगणनेत झाले. हे फुलपाखरू पक्षीगणनेदरम्यान पाच  वेगवेगळ्या ठिकाणी दिसले. शिवाय डार्क पीएर्रोट, थ्री-स्पॉट ग्रास येल्लोव, स्पॉटलेस ग्रास येल्लोव ही दुर्मिळ फुलपाखरेदेखील दिसली.

 

ग्रीन वर्कस् ट्रस्टचे सहकारी व अभयारण्यातील कर्मचार्‍यांनी तीन दिवसात फणसाडच्या विविध ठिकाणी जाऊन पक्ष्यांची नोंद घेतली. या गणनेमुळे पक्षांच्या विविध जाती कळतात. त्याची प्रसिद्धी झाल्याने पर्यटक व पक्षीप्रेमी येथे आवर्जून भेट देतात. त्यामुळे महसूलवाढीला मोठा हातभार लागतो.

-राजवर्धन भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी, फणसाड अभयारण्य, ता. मुरूड

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply