Breaking News

पुनर्वसित भूखंडांवर बांधकामांस प्रारंभ; प्रकल्पबाधितांना परवाने मिळवून देण्यासाठी सिडको प्रयत्नशील

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प व स्थलांतरीत होणार्‍या बांधकामाबद्दल प्रकल्पबाधितांना देशातील सर्वोत्तम अशा 22.5% व पुनर्वसन, पुनःस्थापना पॅकेजअंतर्गत भूखंडांचे वाटप करण्यात येत आहे. बहुतांश  प्रकल्पबाधितांना भूखंडांवर बांधकाम सुरू करण्यासाठी बांधकाम परवानगी देण्यात आली असून, या प्रकल्पबाधितांनी त्या अनुषंगाने आपल्या भूखंडांवर बांधकाम करण्यास सुरूवात देखील केली आहे.

बांधकाम परवाना मिळवण्यासाठीची प्रक्रिया सुलभ असून ती सहज समजण्यासारखी आहे. प्रकल्पबाधितांना त्यांचे बांधकाम तातडीने सुरू करण्यासाठी बांधकाम परवानगी मिळणे आवश्यक असल्याने सिडको महामंडळ बांधकाम परवाने सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

प्रकल्पबाधितांनी त्यांना प्राप्त झालेल्या भूखंडांवर ज्या प्रमाणात बांधकाम करायला सुरूवात केली आहे त्यावरून हे एक सर्व सोयी सुविधांनी युक्त, नियोजनबद्ध व स्वयंपूर्ण असे नगर निर्माण होणार यात शंका नाही. त्याचबरोबर विमानतळ प्रकल्पाचे कामदेखील वेगाने सुरू असून सभोवतालच्या परिसराचा कायापालट होत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे विमानतळ प्रकल्पाला जेव्हा मूर्त स्वरूप प्राप्त होईल तेव्हा तर सभोतालच्या परिसरासोबतच प्रकल्पबाधितांच्या या नगरालादेखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरूप प्राप्त होईल.

या बांधकामांसाठी प्रकल्पबाधितांना रू. 1000 प्रति चौरस फूट बांधकाम अनुदान दिले जात आहे. याशिवाय प्रकल्पबाधितांना रू. 500 प्रति चौरस फूट प्रोत्साहन भत्ता व 18 महिन्यांचे घर भाडे देण्यात येत आहे.

प्रकल्पबाधितांनी सहकार्य करण्याचे आवाहन

सुंदर नगराचे स्वप्न लवकरात लवकर सत्यात यावे यासाठी उर्वरित प्रकल्पबाधितांनीदेखील यात सहकार्य करणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने सिडकोतर्फे उर्वरित सर्व विमानतळ प्रकल्पबाधितांनी या असामान्य नगराची रचना करण्यासाठी लवकरात लवकर आपल्या पुनर्वसनापोटी देय असलेल्या भूखंडाचा ताबा घेऊन बांधकाम परवानगीसाठीची प्रक्रिया सुरू करावी. असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply