Monday , February 6 2023

आदिवासी सेवा संघाकडून श्रवण भगतला आर्थिक मदत

कर्जत : बातमीदार

खेळताना गंभीर जखमी झालेल्या श्रवण विलास भगत (वय 13, रा. भक्ताचीवाडी, ता. कर्जत) याला आदिवासी सेवा संघाने उपचारासाठी आर्थिक मदत केली.

श्रवण भगत याचे वडिलांचे छत्र यापूर्वी हरवले आहे. आर्थिक स्थिती बिकट असल्याने त्याची आई श्रवणवर उपचार करू शकत नव्हती. त्यामुळे आदिवासी सेवा संघाने या तरुणाच्या उपचाराचा भार उचलला आहे. आदिवासी सेवा संघाच्या पदाधिकार्‍यांनी भक्ताचीवाडी येथे जाऊन श्रवण भगत याला रोख स्वरूपात आर्थिक मदत दिली. या वेळी आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष बुधाजी हिंदोळा, जिल्हा उपाध्यक्ष भगवान भगत, कर्जत तालुका अध्यक्ष जैतू पारधी, गणेश पारधी, चंद्रकांत पारधी, बाळू शिवा ठोंबरे, नामदेव निरगुडा, विलास भला, भाऊ मेंगाळ, सुरेश दरवडा, लक्ष्मण दरवडा, संजय केवारी, सुरेश महादू, राजेंद्र निरगुडा, मोतीराम पादिर, बाळू आघान आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply