Breaking News

मुरूड, माणगाव तालुक्यांत कोरोना रुग्णसंख्येत भर

मुरूड : प्रतिनिधी

मुरूड तालुक्यात रविवारी (दि. 16) एका दिवसात 14 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर माणगाव तालुक्यात 83  नवे कोरोनाग्रस्त आढळले. मुरुड तालुका कोरानामुक्त म्हणून ओळखला जात होता. परंतु गेल्या दोन दिवसांत कोरानाबांधितांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. सध्या ओमायक्रॉनचे रुग्ण नसले तरी कोरानाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. रविवारी एका दिवसात 14 नवे कोरोना रुग्ण आढळले. मुरूड तालुक्यात आतापर्यंत एकूण 2022 कोरानाबाधीत रुग्ण आढळले असून त्यापैकी 1868 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 109 जणांचा मृत्यू झाला.  त्यापैकी एकाला अलिबाग येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. तर 44 रुग्ण घरीच उपचार घेत आहेत, अशी माहिती मुरुड ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आली. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मुरूड तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

माणगाव : प्रतिनिधी

तालुक्यात रविवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 83 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. माणगाव तालुक्यात सध्या 417 कोरोनाबाधीत रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply