Breaking News

नेरळ-माथेरान रेल्वे मार्गालगत वृक्षलागवड

लावलेल्या 25 हजार झाडांना संरक्षण

कर्जत : बातमीदार

वणवे रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने कृषिरत्न शेखर भडसावळे यांच्या सगुणा रुरल फाउंडेशनवर नेरळ-माथेरान नॅरोगेज मार्गाच्या बाजूला झाडे लावण्याचे काम सोपविले आहे. त्यानुसार फाउंडेशन एकूण 25 हजार झाडे लावली. त्यांचे संरक्षण होण्यासाठी या झाडांभोवती संरक्षण करणारे कागद लावण्यात आले आहेत.

नेरळ-माथेरान नॅरोगेज रेल्वे मार्गाच्या बाजूला वाला, करवंद, शिंदी, रानकेळी तसेच निर्गुडी आणि घायपात या झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट रुरल फाउंडेशनने   ठेवले होते. त्यानुसार नॅरोगेज रेल्वे मार्गाच्या डोंगर भागात दोन झाडांत पाच मीटर अंतर ठेऊन ही झाडे लावण्यात आली आहेत. त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी  फाउंडेशनकडून या झाडांभोवती कापड बांधण्यात येत आहे. या झाडांना वेळेवर पाणी मिळावे आणि झाडे  वेगाने वाढावीत यासाठी फाउंडेशनने एक पथक तयार केले आहे. या पथकाचे अनिल निवळकर, परशुराम आगिवले आदी या कामावर लक्ष ठेवून आहेत.

Check Also

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक अडथळे दूर करीत काही महिन्यांत पूर्णत्वास येणार …

Leave a Reply