Breaking News

‘सेंट जोसेफ’चा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त

फेब्रुवारी 2019-20 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक 12वी परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कळंबोली येथील सेंट जोसेफ हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजने सायन्स व वाणिज्य शाखेत 100 टक्के यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मिळवून विदुला घोडेकर हिने 95.84 टक्के गुण प्राप्त केले तसेच वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक मिळवून स्नेहा पवार हिने 92.92 टक्के गुण प्राप्त करून दैदिप्यमान यश मिळविले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ए. एफ. पिंटो व व्यवस्थापिका ग्रेस पिंटो यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच ज्युनिअर कॉलजेच्या स्थापनेपासून 100 टक्के निकालाची परंपरा राहिली आहे, व त्यासाठी शिक्षक वर्ग कटिबद्ध आहे, असे मत प्राचार्य रंजना चाफळे यांनी व्यक्त केले आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply