Breaking News

खारघरमध्ये दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; भाजप पदाधिकार्‍यांचे सिडकोला निवेदन

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघर सेक्टर 12 मधील जी टाइपमध्य मागील तीन चार दिवसांपासून परिसरातील अनेक नागरिक या दूषित पाण्यामुळे आजारी पडले आहेत. त्यामुळे त्यांच्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. समस्येचे गांभीर्य ओळखून भाजपच्या पदाधिकार्‍यांनी सिडकोच्या विभागाकडे जाऊन निवेदन दिले. यासोबत ही समस्या लवकरात लवकर सोडविण्याची मागणी केली.

खारघर सेक्टर 12 मधील जी टाइपमध्ये स्मितल सोसायटी (प्लॉट नंबर 135) मध्ये एक आठवड्यापासून, नूतन सोसायटी (प्लॉट नंबर 136), निशिगंधा सोसायटी (प्लॉट नंबर 137) व त्यासमोरील रो हाऊसेसमध्ये दोन दिवसांपासून दुर्गंधीयुक्त दूषित व पिण्यासाठी अयोग्य पाणी येत असल्याची तक्रार आल्यानंतर स्थानिक नगरसेवक रामजी बेरा, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, खारघर मंडल सरचिटणीस दीपक शिंदे, युवा सरचिटणीस अमर उपाध्याय यांनी पाणीपुरवठा विभागाचे  अधिकारी चेतन देवरे यांच्याशी संपर्क साधून तक्रार पत्र देऊन या गंभीर प्रकरणाची समस्या निदर्शनास आणून दिली. या वेळी अधिकारी चेतन देवरे यांनी लवकरात लवकर तांत्रिक दोष शोधून यावर मार्ग काढला जाईल, असे आश्वासन देऊन तात्पुरत्या टँकरची व्यवस्था करून दिली आहे.

सरचिटणीस दीपक शिंदे यांनी या परिसरातील व्यक्तींना काही दिवस पाणी उकळून प्यावे जेणेकरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही, असे आवाहन करण्यासाठी सिडको अधिकार्‍यांना विनंती केली आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply