अलिबाग ः कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी, तसेच सध्या अनेक लोक लसीकरण केंद्रावर मोठ्या संख्येने लस टोचून घेण्यासाठी गर्दी करीत असल्याने रायगड जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांच्या 200 मीटर परिसरात संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. पूर्व नोंदणीनुसार लसीकरणासाठी बोलाविण्यात आलेली व्यक्ती, सक्षम नसलेली व्यक्ती असल्यास सोबत येणारी व्यक्ती, लसीकरण केंद्रावर वैद्यकीय सेवा देणारे, पोलीस, साफसफाई कर्मचारी, परिसरात रहिवास असलेली व्यक्ती आणि अशा रहिवासी क्षेत्रात मान्यता दिलेल्या जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी येणारी व्यक्ती यांनाच प्रवेश मिळणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper