Monday , June 5 2023
Breaking News

भाजपच्या वतीने एसटी कर्मचार्यांना धान्यवाटप

महाड : प्रतिनीधी

महाड भाजपच्या वतीने एसटी कामगारांना धान्यवाटप करण्यात आले. गेले दोन महिने महाराष्ट्रातील एसटी कार्मचार्‍यांचा संप सुरू आहे, गिरणी कामगाराप्रमाणेच हा कामगारदेखील देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. पगार नाही, शेती नाही, दुसरा रोजगार नाही, त्यामुळे या कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा वेळी भाजप या कामगारांसाठी धावून आले आहे.

आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. एसटीचा कामगार देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. जवळपास 80 कमगारांनी आत्महत्या केली आहे. दुसरा कोणताच रोजगार नसल्याने या कामगांवर उपासमारीची वेळ आली आहे. महाड आगारतदेखील या घडीला जवळपास 178 कामगार संपावर आहेत, मात्र आज या कामगारांकडे लक्ष द्यायला ना सरकारला वेळ आहे ना लोकप्रतिनिधींना. अशा वेळी महाड भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष अजित अवकीरकर यांच्या माध्यमातून या कामगारांना जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांच्या हस्ते धान्यवाटप करण्यात आले. या वेळी तालुका सरचिटणीस महेश शिंदे, उपतालुकाध्यक्ष चंद्रजित पालांडे, उपशहराध्यक्ष अप्पा सोंडकर, तुषार महाजन आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply