Breaking News

पोल्ट्रीमुळे बीडखुर्द परिसरात दुर्गंधी

प्रजासत्ताक दिनापासून बेमुदत उपोषणाचा ग्रामस्थांचा इशारा

खोपोली : प्रतिनिधी

खालापूर तालुक्यातील बीडखुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एका पोल्ट्रीफार्मच्या दुर्गंधीमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या पोल्ट्री व्यवसायिकावर कारवाई करावी, अन्यथा प्रजासत्ताक दिनापासून (दि. 26) बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी खालापूर तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.

बीडखुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ही पोल्ट्री बंद करण्याचा ठराव 25 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते पारित करण्यात आला होता, परंतु पोल्ट्री व्यावसायिकावर कोणतीही कारवाई झाली नाही. 25 नोव्हेंबर 2021 रोजी खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी याच्या दालनात झालेल्या विशेष बैठकीत   ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडून दुर्गंधी पसरवणारी पोल्ट्री बंद करण्याची मागणी केली होती, त्या वेळी तहसीलदार तांबोळी यांनी पोल्ट्रीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. तसेच हा अहवाल सादर झाला की योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे अश्वासन दिले होते. त्याला दोन महिने होत आले, तरी पोल्ट्री व्यावसायिकांवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे ही पोल्ट्री बंद करावी आणि व्यावसायिकावर योग्य ती कारवाई व्हावी, यासाठी प्रजासत्ताक दिनापासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन बीडखुर्द ग्रामस्थांनी खालापूर तहसीलदार, पंचायत समिती कार्यालय, खोपोली व खालापूर पोलीस ठाणे, बीडखुर्द ग्रामपंचायत कार्यालय यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींना दिले आहे.

दरम्यान, पं. स. सदस्य अक्षय पिंगळे यांच्या पुढकाराने बीडखुर्द येथील पोल्ट्री व्यवसायिकाचे सर्व परवाने रद्द करून ही पोल्ट्री कायमस्वरूपी बंद करावी, असा ठराव खालापूर पंचायत समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

Check Also

हम दिल दे चुके सनम @ 25

उत्कंठामय गोष्ट, देखणं सादरीकरण समीर (सलमान खान) भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी या कलेतील निष्णात पंडित …

Leave a Reply