Breaking News

पेणमधील सेंट्रल बँकेला आग; लाखोंचे नुकसान

पेण : प्रतिनिधी

पेणमधील रायगड बाजार इमारतीतील तळमजल्यावर असलेल्या सेंट्रल बँकेला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आग लागून लाखो रुपयांची हानी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत माहिती अशी कि, पेण धरमतर रडवर रायगड बाजार इमारतीत तळमजल्यावर सेंट्रल बँक ऑफ इंडियाची शाखा असून शेजारी एटीएम सेंटरही आहे. शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान बँक बंद असताना आतून धुराचे लोट बाहेर येताना नागरिकांना दिसले. नागरिकांनी ताबडतोब पेण पोलीस ठाण्यात आग लागल्याची माहिती दिली. या वेळी पोलिसांनी पेण नगरपरिषद व जे. एस. डब्ल्यु कंपनीच्या अग्निशन दलाला पाचारण केले. आगीत बँकेतील वातानुकुलीत यंत्र, कागदपत्रे, फर्निचर व एटीएम मशीन संपूर्ण जळून खाक झाले असून प्राथमिक अंदाजानुसार आग शॉर्टसर्किट मुले लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही इमारत फार जुनी असल्याने व्यापारी संकुलातील पहिला व दुसरा मजला पूर्णपणे यापूर्वीच रिकामा करण्यात आला आहे. तसेच इमारत गळकी असल्याने शॉर्टसर्किट झाल्याची चर्चा पेण शहरात सुरू आहे.

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply