Breaking News

कर्जत दामत येथील अवैध कत्तलखान्यांवर धाड

गोमांसासह जीवंत जनावरे ताब्यात

कर्जत : बातमीदार

रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून शुक्रवारी (दि. 4) पहाटे कर्जत तालुक्यातील दामत गावात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर धाड टाकण्यात आली. त्यावेळी गोमांस विकणार्‍या एकास अटक केली असून, 215 किलो गोमांस जप्त करण्यात आले. कत्तलीसाठी आणलेली काही जीवंत जनावरे ताब्यात घेण्यात आली असून त्यांना गोशाळेत पाठविण्यात आले आहे.

नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील दामत गावात अवैध गोमास विक्री आणि अवैद्य कत्तल केली जात असल्याची खात्रीलायक माहिती रायगड जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास या विभागाच्या पथकाने दामत गावात घेराबंदी करून धाड टाकली. या वेळी आरोपी उसामा वसीम नजे (वय 19) हा त्यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत हत्यारांसह सापडून आला. त्या ठिकाणी काही गोमांस कापून लटकवलेले आढळलेे. याशिवाय काही अंतरावर एका बंदिस्त खोलीत कत्तलीसाठी आणलेली आठ जीवंत जनावरे आणि त्यांना वाहून नेण्यासाठी आणलेला पिकअप टेम्पो आठळून आला. जनावरे आणि टेम्पो स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतला. मात्र दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.

या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पळून गेलेल्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply