वुहान (चीन) : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असले तरी एक दिलासादायक गोष्ट म्हणजे या विषाणूपासून बाधित झालेले रुग्ण बरे होऊन घरीही परतत होते, मात्र आता एक धक्कादायक बाब समोर आली असून बरे झालेल्या रुग्णांना कोरोनाची परत लागण होत असल्याचे समोर आले आहे.
गेल्या महिन्याभरात चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. चीनमधील जवळजवळ 78 हजार लोकं निरोगी झाली आहेत. केवळ पाच हजार लोकं सध्या उपचार घेत आहेत, मात्र चीनसमोर आता एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. कोरोना आजारापासून निरोगी झालेल्या रुग्णांपैकी 10 टक्के रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुन्हा कोरोनाची लागण होण्यामागील कारण आरोग्य विभागातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनासुद्धा समजू शकलेले नाही, पण कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णालयात उपचारादरम्यान जी औषधे वापरली जातात, त्याचा परिणाम संपल्यानंतर पुन्हा शरिरात कोरोना विकसित होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांपैकी 8 ते 10 टक्के रुग्णांना पुन्हा कोरोना संसर्ग होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …