पनवेल ः रामप्रहर वृत्त
एसटी कर्मचार्यांचा विलगीकरणाचा लढा सुरू आहे. या लढ्यात पनवेल बस आगारातील कर्मचारी सहभागी असून त्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. दरम्यान या कर्मचार्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील यांनी या कर्मचार्यांना जीवनावश्यक वस्तूंचे शनिवारी (दि. 26) वाटप केले.
सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमी अग्रेसर असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आणि पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील यांच्या पुढाकाराने पनवेल आगारात आंदोलनाला बसलेल्या एसटी कर्मचार्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सदानंद पाटील, हरिदास वनवे, विश्वास काथारा, संदीप डोंगरे आदी उपस्थित होते.