Breaking News

फुंडे कॉलेजमध्ये मंगळवारी पारितोषिक वितरण समारंभ

उरण : बातमीदार

रयत शिक्षण संस्थेच्या तु. ह. वाजेकर विद्यालय आणि वीर वाजेकर एएससी कॉलेज, महालण विभाग फुंडे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 15) वाजेकर पुण्यतिथी व  महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहणार आहेत. यासोबतच पी. जे. पाटील, कृष्णा कडू, भावना घाणेकर, सुधीर घरत आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. जी. पवार यांनी दिली आहे. महाविद्यायातील सांस्कृतिक व क्रीडा विभागामार्फत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सांस्कृतिक विभागाअंतर्गत रांगोळी, मेहेंदी, निबंध, वक्तृत्व, वादविवाद, पारंपरिक वेशभूषा, कवितावाचन इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तर क्रीडा विभागामार्फत विविध वैयक्तिक तसेच सांघिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कार्याध्यक्ष डॉ. राहुल पाटील यांनी केले आहे.

Check Also

लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही -खासदार श्रीरंग बारणे

पनवेल : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही. आता …

Leave a Reply