Breaking News

नवी मुंबईत संगीत विद्यालय उभारण्याची भाजपचे विकास सोरटे यांची मागणी

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबई पालिकेच्या होऊ घातलेल्या सन 2022-23 अर्थ संकल्पात यंदा शिक्षण क्षेत्रावर भर द्यावा. ज्युनियर कॉलेज सुरू करावे. नवी मुंबई महापालिकेतर्फे संगीत विद्यालयाची उभारणी करावी व त्या विद्यालयाला भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर  यांचे नाव द्यावे. शाळांचे आधुनिकीकरण करावे अशा विविध मागण्या भाजपचे विकास सोरटे यांनी आयुक्तांकडे केल्या आहे. नवी मुंबईतील महापालिका संचलित सर्व शाळांचे आधुनिकीकरण करावे. शाळांमध्ये खाजगी शाळांसारखे उत्तम दर्जाचे शिक्षक व शिक्षण दिले जाईल यावर भर द्यावा. नवी मुंबई महापालिका संचलित शाळांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात नवी मुंबईतील मध्यमवर्गीय विद्यार्थी आकर्षित होतील याकरीता कार्यक्रम राबवावा. शाळांमध्ये ज्युनियर कॉलेज ही सुरू करावेत. नवी मुंबई महापालिकेतर्फे महाविद्यालयाची उभारणी करावी. नागरी आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण करावे. नागरी आरोग्य केंद्रात रक्त तपासणी, एक्स रे आणि मोफत औषधांची व्यवस्था करावी. नागरी आरोग्य केंद्रात तज्ञ डॉक्टरांची ही बसण्याकरीता तरतुद करावी. प्रत्येक नोडमध्ये संविधान चौक उभारावेत. बृह्ममुंबई महापालिका संचलित हायवे सुविधा हा उपक्रम नवी मुंबई परीसरात ही राबवावे. अभ्यासिका व व्यायाम शाळांचे आधुनिकीकरण करावे, अशा विविध मागण्या भाजपाचे सोरटे यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply