Saturday , June 3 2023
Breaking News

रसायनीमध्ये हेल्मेट वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी

रसायनी पोलीस ठाणे आणि जय प्रेसिजन प्रोडक्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान राबविण्यात आले. यामध्ेय रस्त्यावरुन दुचाकी घेऊन जाणार्‍या दुचाकीस्वारांना हेल्मेट वाटप करण्यात आले. या वेळी रसायनी पोलीस ठाण्याच्या वतीने हेल्मेट वापरा, वाहतुकीचे नियम पाळा, पोलिसांना सहकार्य करा असे सांगण्यात आले. रसायनी पोलीस ठाण्याजवळच सिध्देश्वरी पराडे रस्त्यावर जय प्रेसिजन कंपनीचे पदाधिकारी आणि रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांच्याहस्ते रस्त्यावरुन दुचाकी घेऊन जाणार्‍या दुचाकीस्वारांना हेल्मेट वाटप करण्यात आले. या वेळी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाचे महत्त्व  वाहनचालकांना सांगण्यात आले. वाहन चालविताना घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज दत्तात्रेय गुंड, पोलीस नाईक मंगेश लांगी, विशाल झावरे, भुपेश वेल्हे आदींसह महिला कर्मचारी व जय प्रेसिजन कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply