Friday , June 9 2023
Breaking News

बांधनवाडी येथे शिक्षण हक्क कायद्याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा

मोहोपाडा : प्रतिनिधी

अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा, राष्ट्र सेवा दल रायगड आणि ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था, बांधनवाडी यांच्यावतीने एक दिवसीय शिक्षण हक्क कायदा व त्यातील तरतुदी या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस पनवेल, पेण, खालापूर आणि अलिबाग तालुक्यातील 30 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अन्वये येत्या शैक्षणिक वर्षांत खाजगी शाळांमध्ये 25 मोफत प्रवेशाची प्रक्रिया येत्या 16 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होत असून याचा लाभ अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना होणार आहे, मात्र या प्रवेश प्रक्रियेबद्दल अनेक विद्यार्थी आणि पालकांना माहिती नसल्यामुळे अनेक लाभार्थी या प्रवेशापासून वंचित राहतात हे लक्षात घेऊन ही कार्यशाळा झाली. अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यशाळेत शिक्षणतज्ञ प्राध्यापक शरद जावडेकर आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, युसूफ मेहेरली सेंटरचे प्रकल्प संचालक सुरेश रासम यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. सुरेखा खैरे यांनी सोळा तारखेपासून सुरू होणार्‍या पंचवीस टक्के मोफत प्रवेश प्रक्रिये विषयी संगणक प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले.

Check Also

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शांतता कमिटीची बैठक

पनवेल : वार्ताहर सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस वायरल होत असल्याने हिंदुत्ववादी …

Leave a Reply