Breaking News

व्यावयायिका दोघांनी लुटले

पनवेल : वार्ताहर

रिक्षामधुन आलेल्या दोघा लुटारुंनी एका व्यावसायीकाच्या हातातील 10 लाख रुपयांची रोख रक्कम असलेली पिशवी लुटून पलायन केल्याची घटना सीबीडी सेक्टर-3 परिसरात नुकतीच घडली आहे. सीबीडी पोलिसांनी या घटनेतील दोघा लुटारुविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरू केला आहे.  या घटनेतील तक्रारदार बजरंग म्हात्रे हा व्यावसायीक पनवेलमधील वलप गावात राहण्यास असुन त्याचा जुन्या गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. बजरंगचा व्यावसायीक मित्र निखील उसाटकर याला गाडी खरेदी विक्री व खाजगी कामासाठी 10 लाख रुपयांची गरज असल्याने त्याने बजरंगकडे रक्कमेची मागणी केली होती. त्यामुळे बजरंग 10 लाख रुपयांची रक्कम घेऊन सीबीडी सेक्टर-3 मधील पवन हॉटेल समोर निखील याला देत असताना रिक्षामधुन आलेल्या दोघा लुटारुंनी बजरंगच्या हातात असलेली रोख रक्कमेची पिशवी हिसकावली व पलायन केले. बजरंग आणि निखील या दोघांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र ती रिक्षा हाती लागली नाही. या प्रकाराने बजरंग याची प्रकृती बिघडल्याने त्याने दवाखान्यात उपचार करून सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply