Friday , September 22 2023

कर्नाळा खिंडीत शिवशाही बसचा अपघात; एकाच मृत्यू, 22 प्रवासी जखमी

पनवेल : वार्ताहर
मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल तालुक्यातील कर्नाळा खिंडीत मंगळवारी (दि. 25) एसटी महामंडळाची शिवशाही बस उलटून एकाचा मृत्यू, तर 22 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त शिवशाही बस (एमएच 09 इएम 9282) पनवेलहून महाडच्या दिशेने निघाली होती. कर्नाळा खिंडीतील तलावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस उलटली. या बसमधून 38 प्रवासी आणि चालक व वाहक असे एकूण 40 जण प्रवास करीत होते. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 22 प्रवासी जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पथक तसेच पळस्पे वाहतूक पोलीस शाखेच्या वरिष्ठ निरीक्षक स्मिता जाधव यांचे पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी मदतकार्य सुरू केले. या वेळी अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेमधून पनवेल उपजिल्हा रुग्णालय तसेच कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, याच मार्गावर एका रेनॉल्ट्स कंपनीच्या कारचाही अपघात झाला होता. या अपघातांमुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती.

Check Also

खारघरमध्ये भाजपतर्फे सिग्नलचे लोकार्पण

खारघर ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73वा वाढदिवस देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून …

Leave a Reply