Breaking News

नारी फिट इंडिया फिट कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : बातमीदार

नवीन पनवेलमधील सेक्टर 16 मधील सिडको गार्डनमध्ये डॉ. शुभदा नील यांनी आयोजित केलेल्या डायट, संगीतमय योगा कार्यक्रमाला सोमवारी (दि. 2) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी मार्गदर्शनपर भाषणात डॉ. शुभदा नील म्हणाल्या की, गोड खाऊ नये. पालक, दुधी, पेरु, सफरचंद, कडीपत्ता, तुळस, पुदिना, नागवेल पाने, दालचिनी, काळी मिरी यांचा ज्युस घ्या. रोज एक फळ खा, बटाटे खाऊ नका, सकाळी भिजवलेले बदाम आणि अक्रोड, मोड आलेले कडधान्य विशेष मोड आलेली मेथी खा, पापड आणि लोणचे खाऊ नका, नारळाची चटणी खा, जेवल्यानंतर थोडे जवस, तील आणि ओवा खा. स्पिरुलिना पावडर, खोबरेल तेल, दुधी, मूग पीठ घालून तयार केलेली गव्हाची चपाती किंवा ज्वारीची भाकरी खाण्याचा सल्ला त्यांनी दिला. महिला सशक्तीकरण, मेडीटेशन द्वारा आंतरिक शक्ती वाढवून स्वतःच केले पाहिजे, महिलांनी स्वतःला व इतर महिलांना सन्मान दिला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. महापौर डॉ. कविता चौतमोल म्हणाल्या की, तीन महिन्यात संगीतमय योगामुळे अनेकांचा मधुमेह नष्ट झाला आहे. डॉ. नील आणि डॉ. कीर्ती समुद्र यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. डॉ  कीर्ती समुद्र यांनी गेली तीन महिने चालू असलेला व्यायाम आता सोडू नका, असे आवाहन उपस्थितांना केले. या वेळी माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, मंगला बिराजदार यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले. कार्यक्रमास अर्चना परेश ठाकूर, अ‍ॅड. प्रीती भुजबळ, अ‍ॅड. सुरेखा भुजबळ, डॉ. किर्ती समुद्र, मंगला गडमुळे, मनोज भुजबळ, राजश्री वावेकर, विद्या गायकवाड, अ‍ॅड. वृषाली वाघमारे, संदीप पाटील, वर्षा नाईक, अनिता भोर, संगीता विसपुते, गीता गुप्ता आदी मान्यवर व 500 हून अधिक महिला उपस्थित होत्या. या वेळी डॉ. नील यांनी संगीतमय योगा प्रात्यक्षिकांसह उपस्थित महिलांकडून करून घेतला. तारादीदी यांनी ध्यानधारणेचे महत्व सांगून  ध्यानधारणा करून घेतली. या वेळी काही महिलांनी गेले तीन महिन्यात संगीतमय योगाचा फायदा कसा झाला ते सांगितले. पनवेल महानगरपालिकेच्या मदतीने असा कार्यक्रम वेगवेगळ्या विभागात चालू केला जाईल, असे आश्वासन डॉ. शुभदा नील यांनी दिले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply