केंद्रीय पेट्रोलियम मंत्री भगवंत खुबा यांचे आश्वासन
पाली ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यासह कोकणातील बहुतांश लोक उदरनिर्वाहासाठी मत्स्यव्यवसायावर अवलंबून आहेत, मात्र आजघडीला या घटकासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. कोळी बांधवांच्या अडचणी व त्यांना उद्भवणार्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय पेट्रोलियममंत्री भगवंत खुबा यांनी दिले. आमदार रमेश पाटील, चेतन पाटील यांच्यासमवेत नवगाव, थळ येथील मच्छीमार संस्थेचे चेअरमन उल्हास वाटकरे, दिलेश चिटके,धनंजय कोळी, सुधाकर रोगे, गजानन लाकडे, गणपत कोळी, लक्ष्मण सुरकर, जाया लोंढे, शिवदास भूडे, रुपम सुरकर यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री भगवंत खुबा यांची नुकतीच भेट घेतली व समस्या मांडल्या. या वेळी ना. खुबा यांनी मासेमारी समस्या सोडविणार असल्याचे आश्वासन दिले.