Breaking News

मतदानाच्या दिवशी रोजंदारीवरील कामगार कामाच्या प्रतीक्षेत

पनवेल : प्रतिनिधी

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानामुळे आज रोजंदारीवर काम करणार्‍या अनेकांना रोजगार न मिळाल्याने लोकशाहीचा महोत्सव साजरा होत असताना पाणी पिऊन दिवस काढावा लागणार असल्याचे पनवेलच्या गांधी हॉस्पिटलजवळील कामगार नाक्यावरील कामगार बबलू परमारने सांगितले.

पनवेलमध्ये गांधी हॉस्पिटलजवळ पुलाखाली,  तसेच नवीन पनवेलमध्ये शिवा कॉम्प्लेक्सजवळ  कामगार नाका आहे. या ठिकाणी रोज सकाळी अनेकजण आपल्याला रोजी-रोटी मिळावी यासाठी येऊन उभे राहत असतात. यामध्ये कुशल आणि अकुशल अशा दोन्ही प्रकारचे कामगार असतात. त्या ठिकाणी येऊन ज्याला कामगार पाहिजेत तो येऊन मजुरी ठरवून त्यांना घेऊन जातो. काम मिळाले तरच त्यांना रोटी मिळते. या कामगारांपैकी अनेक स्त्री-पुरुष हे स्थलांतरित असल्याने त्यांचे मतदान येथे नाही.

सोमवारी (29 एप्रिल) लोकसभा मावळ मतदारसंघात मतदान असल्याने अनेक आस्थापनांमध्ये कामे बंद ठेवण्यात आली असल्याने आज या कामगारांना नेण्यासाठी कोणी ठेकेदार आले नाहीत. त्यामुळे दुपारी 12 वाजले, तरी या पुलाखाली कामगारांची गर्दी होती. आज काम मिळत नसल्याने घोळका करून बसलेले कामगार कोणी त्यांच्याजवळ थांबल्यावर साहेब आम्हाला मतदानाच्या पेट्या उचलायचे तरी काम द्या, अशी मागणी करीत होते.

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply