Breaking News

पनवेलकरांना ऑनलाइन मालमत्ता उतारा मिळणार विनाशुल्क

पनवेल ः प्रतिनिधी

महापालिकेच्या मालमत्ता कर विभागासाठी नव्याने विकसित केलेल्या संगणक प्रणालीद्वारे काढण्यात येणारा ऑनलाइन मालमत्ता उतारा हा आता पनवेलकरांना विनाशुल्क मिळणार आहे. स्थायी समितीने या विषयास मंजुरी दिली आहे. ऑनलाइन मालमत्ता उतारा विनाशुल्क मिळावा अशी नागरिकांची वारंवार मागणी होत असल्याने महापालिकेने हा उतारा विनाशुल्क देण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र मालमत्ताधारकांनी प्रत्यक्ष मालमत्ता विभागातून मालमत्ता उतारा घेतल्यास त्यांना विहीत केलेली प्रती उतारा 100 रुपये फी द्यावी लागणार आहे तसेच ऑनलाइन उतारा घेण्यासाठी मालमत्ताधारकांनी आपला संपूर्ण मालमत्ता कर भरणा करणे आवश्यक असून त्यानंतरच वेबसाइटवरून विनाशुल्क उतारा डाऊनलोड करता येईल.  पनवेलकरांना ऑनलाइन मालमत्ता उतारा मिळणार विनाशुल्क पनवेल महानगरपालिकेमार्फत मालमत्ताधारकांना ई-सुविधा देण्याकरिता तसेच नागरिकांच्या वेळेची बचत व्हावी, घरबसल्या आपल्या मालमत्ता करासंबंधित तसेच नोंदणीकृत मालमत्तेबाबत संपूर्ण माहिती देण्याच्या हेतूने ‘मनपा आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ‘पीएमसी टॅक्स अ‍ॅप’ हे मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून ई-गव्हर्नन्सच्या दृष्टीने पालिकेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. आतापर्यंत चार हजार 559 नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करून घेतले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आजपर्यंत 24 लाख 49 हजार 715 एवढा मालमत्ता कर भरला आहे. अनेक नागरिकांनी या अ‍ॅपमधील विविध सुविधेचा लाभ घेतला आहे तसेच या अ‍ॅपबद्दल समाधान व्यक्त केले आहे. 31 मार्च 2022पर्यंत मालमत्ता करांवर पाच टक्के सूट देण्यात आली आहे. नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

‘मनपा आपल्या दारी’

नागरिकांना मालमत्ताकरासंदर्भात माहितीसाठी वारंवार महापालिकेत ये जा करावी लागू नये यासाठी पालिकेने 40 टॅब आपल्या कर्मचार्‍यांना दिले आहेत. या टॅबच्या माध्यमातून कर्मचारी घरोघरी जाऊन मालमत्ता कराचे बिल, टॅक्सीची माहिती, उतारा, मालमत्तेविषयीची माहिती देत आहेत. यासाठी ’क्लार्क ईपीके’ हे सॉफ्टवेअर पालिकेने विकसित केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply