पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या दापोली येथील शेतकरी कामगार पक्षाचे माजी उपसरपंच गजानन तुळशीराम पाटील आणि त्यांच्या शेकडो सहकार्यांनी रविवारी (दि. 13) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी व अन्य मान्यवरांनी स्वागत केले. खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष के. ए. म्हात्रे, पं. स. सदस्य रेखा म्हात्रे, माजी सदस्य सुभाषशेठ म्हात्रे, सुजाता जितेकर, कुंडेवहाळचे सरपंच सदाशिव वास्कर, पाटणोलीचे माजी सरपंच प्रकाश पाटील, दापोलीचे माजी सरपंच गोवर्धन डाऊर, पारगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य कल्पना तारेकर, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष राकेश गायकवाड, सुनीलशेठ म्हात्रे, विहान जितेकर, समीर केणी, मंगेश शेलार आदी उपस्थित होते. या वेळी शेकापचे गजानन पाटील, राजकुमार जितेकर, राहुल पाटील, दशरथ पाटील, जितेंद्र जितेकर, भरत कुडावकर, अरुण तारेकर, सावळाराम पाटील, चिंतामण घोपरकर, रवींद्र पाटील, समीर पाटील, शिवतेज जितेकर, प्रतिश पाटील, विक्रांत जितेकर, एकनाथ जितेकर, प्रफुल्ल जितेकर, प्रितम जितेकर, प्रतिश जितेकर, केतन जितेकर, विपुल जितेकर, ओमकार कुडावकर, रॉबिन कुडावकर, राम जितेकर, लक्ष्मण जितेकर, शेखर पाटील, साई पाटील, सागर पाटील, साजन घरत, प्रथमेश घरत, सयंम जितेकर, विनीत घरत, अवी जितेकर, पराग पाटील, निरज पाटील, माणिक पाटील, चंद्रकांत देशमुख, मेघनाथ म्हात्रे, प्रथमेश म्हात्रे, नितीन म्हात्रे, विशाल पवार, हरिभाऊ पवार, दिलीप पवार, तुषार पवार, सत्यवान पाटील, हर्षद जितेकर, कैलास पाटील, प्रसाद पवार, परेश फडके, गणेश पाटील, अल्पेश हजारे, पवन जितेकर, सुमित जितेकर, प्रदीप जितेकर, कुंदन जितेकर, मनीषा पाटील, सोनाली पाटील, धनश्री पाटील, सुषमा जितेकर, अरुणा जितेकर, लता जितेकर, सरिता जितेकर, आशा जितेकर, रत्ना जितेकर, सरिता पाटील, स्वप्नाली जितेकर, रिया जितेकर, प्रणाली जितेकर, मनाली पाटील, बेबी म्हात्रे, अलका म्हात्रे, हर्षदा म्हात्रे, संगीता म्हात्रे, विजया पवार, भूमिता फडके, रूपाली भोईर, स्नेहल पाटील यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे मान्यवरांनी स्वागत केले.