पनवेल ः रामप्रहर वृत्त
जागतिक महिला दिनानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नाच गं घुमा पनवेल प्रस्तुत ‘संतांची मांदियाळी’ हा नाट्यप्रयोग शनिवारी (दि. 12) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सादर झाला. विशेष म्हणजे या नाटकात केवळ महिलांनी भूमिका साकारल्या. या नाटकाच्या लेखिका सुनिता खरे असून दिग्दर्शक शरद दातार आहेत. नाट्यप्रयोगावेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, पं. स. सदस्य तथा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्ष वर्षा नाईक, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर तसेच वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, सुप्रसिद्ध नाट्यनिर्मात्या कल्पना कोठारी, माजी नगरसेविका निता माळी आदी उपस्थित होते.